पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

सुयश गरगटे व प्रियांका इंगळे संघांचे कर्णधार
। मुंबई । प्रतिनिधी ।
सोलापूर येथे झालेल्या 57 व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून निवड समिती सदस्य नामदेव गोमारे लातूर, महेंद्र गाढवे सातारा, कमलाकर कोळी ठाणे व नेहा तपस्वी पुणे यांनी निवडलेले महाराष्ट्राचे पुरुष-महिला संघ महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. या संघाचे प्रशिक्षक म्हणून बिपीन पाटील मुंबई यांची पुरुषांसाठी तर महेश पालांडे ठाणे यांची महिला संघासाठी निवड झाली आहे. या दोन्ही संघांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार अ‍ॅड.अरुण देशमुख यांनी संपूर्ण क्रीडा गणवेश पुरस्कृत केला आहे. या संघास भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. जबलपूर, मध्य प्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या 54 व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद स्पर्धेत हे संघ सहभागी होणार आहेत. या संघाचे सराव शिबिर कुळगाव, जि. ठाणे येथे सुरू झाले आहे.

Exit mobile version