वेदांत देसाई व नम्रता यादव मुंबईचे, तर गजानन शेंगाळ व मृणल कांबळे ठाण्याचे कर्णधार
। मुंबई । प्रतिनिधी ।
57 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या क्रीडांगणावर, वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी मुंबई जिल्ह्याचे पुरुष महिला संघ 18 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या मुंबई जिल्हा निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून निवड करून जाहीर करण्यात आला आहे. तर, ठाणे जिल्ह्याचे पुरुष महिला संघ 24 नोव्हेंबर रोजी, रा.फ. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात निवड चाचणी संपन्न झाली होती. त्यातून संघ निवड जाहीर करण्यात आले आहेत. ठाण्याचा संघ कृष्णा माळी, महेश पालांडे व मंदार कोळी यांनी निवडला आहे.
मुंबई पुरुष संघ: श्रेयस राऊळ, चैतन्य धुळप, प्रसाद पठाडे, करण गारोळे (सर्व सरस्वती स्पो. क्लब), आयुष गुरव, जितेश नेवाळकर, विश्वजीत कांबळे, संम्यक जाधव (सर्व विद्यार्थी क्रीडा केंद्र), प्रयाग कनगुटकर, शुभम शिगवण (सर्व ओम समर्थ), निरव पाटील (अमर हिंद), वेदांत देसाई (कर्णधार) (श्री समर्थ), प्रशिक्षक- केदार सुर्वे, व्यवस्थापक – सुधाकर राऊळ.
मुंबई महिला संघ : खुशबू सुतार, सेजल यादव, नम्रता यादव (कर्णधार), नताशा नतापे (सर्व सरस्वती कन्या संघ), शिवानी गुप्ता, ऐश्वर्या पिल्ले, मयुरी लोटनकर, प्रतीक्षा महाजन (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), मधुरा पेडणेकर, रिद्धी कबीर (सर्व अमर हिंद मंडळ), रिया कदम, रश्मी दळवी (सर्व ओम साई ईश्वर सेवा मंडळ) प्रशिक्षक – डलेश देसाई, व्यवस्थापिका- अक्षया गावडे.
ठाणे पुरुष संघ – गजानन शेंगाळ (कर्णधार), लक्ष्मण गवस, आकाश कदम, जितेश म्हसकर, संकेत कदम, निखिल वाघे, आकाश तोरणे, अक्षय कळसेकर, शुभम उतेकर, सिद्धेश तांडेल, अक्षय भोईर, अमन टोळे. प्रशिक्षक- विकास कोळी, व्यवस्थापक- ऋषिकेश हिवरकर.
ठाणे महिला संघ- मृणल कांबळे (कर्णधार), रुपाली बडे, दीक्षा कदम, तेजश्री कोंढाळकर, पूजा फरगडे, गीतांजली नरसाळे, कविता घाणेकर, रेश्मा राठोड, मनोरमा शर्मा, दिक्षा सोनसुलकर, अश्विनी मोरे, कल्याणी कंक, प्रशिक्षक- महेश (मयूर) पालांडे, व्यवस्थापिका- पूजा सजगणे.