7 ते 18 डिसेंबरदरम्यान नागपुरात अधिवेशन

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 18 डिसेंबरदरम्यान नागपुरात होणार आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना वेळेत उत्तरे मिळावीत, यासाठी राज्य सरकारने मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कडक निर्देश दिले आहेत.

संसदीय कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, संबंधित विभागाचा विषय सभागृहात चर्चेला येणार असल्यास मंत्र्यांनी सभागृहात, तर विभागाच्या सचिवांनी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहणे आवश्यक आहे. मंत्रालयात स्वतंत्र पथके नियुक्त करून सभागृहाच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाणार आहे.

तारांकित-अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभागीय सचिवांनी अधिवेशन काळात दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version