| पुणे | वृत्तसंस्था |
सौराष्ट्र, राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय चौदा वर्षांखालील गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत दुसर्या दिवस अखेरीस गुजरात संघाला चार बाद 176 धावांत रोखून महाराष्ट्राने सामन्यावरील पकड कायम राखली आहे.
महाराष्ट्राने पहिल्या दिवस अखेरच्या 2 बाद 338 अशा भक्कम स्थितीनंतर बुधवारी (दि.7) 8 बाद 444 धावसंख्येवर घोषित केला. सलामीच्या जोडीच्या शतकी खेळीनंतर विहान कंजेला (78) आणि प्रज्वल मोरेने (65) अर्धशतकी खेळी केली. महाराष्ट्राच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना गुजरातने सावध सुरवात केली. पण, त्यांचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. दिवस अखेरीस गुजरातची अवस्था चार बाद 176 अशी झाली असून, शौर्य पांचोली 10 आणि युवराज किशनचंदानी 11 धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्राकडून वेदांत सुंतालेने दोन गडी बाद केले. सामन्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.
धावफलक : महाराष्ट्र - (118.5 षटकांत) 8 बाद 444 (एकनाथ देवाडे 125, दीप जाधव 109, विहान कंजेला 78, प्रज्वल मोरे 65, प्रसाद आंबले 25, रिधम पटेल 4-111, नील पुरानी 2-80) गुजरात - (65 षटकांत) 4 बाद 176 (जानव पटेल 38, जयवर्धन चावडा 36, यश पटेल 34, आरव कोठारी 26, वेदांत सुंताले 2-56, अर्जुन साळुंखे 1-21, प्रसाद आंबले 1-36)
