राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट
| मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी अर्धा डझन पदकांची कमाई केली. शुभंकर या पुण्याच्या खेळाडूने पुरलेल्या मल्लखांबावर अप्रतिम कौशल्य दाखवले. त्याच्या कौशल्यात लवचिकता आणि वेग याचाही समावेश होता. दोरीच्या मल्लखांब प्रकारात अक्षय सुवर्णपदक जिंकले आणि दुहेरी कामगिरी केली. रविवारी त्याने वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती; तर शुभंकर याला रौप्यपदक मिळाले होते.
दोरीच्या मल्लखांब प्रकारात रूपाली गंगावणे हिने सुवर्णपदक पटकावले. तिची सहकारी नेहा क्षीरसागर हिला ब्रॉँझपदक मिळाले. रूपालीने याआधी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात विजेतेपद पटकावले होते. पुरलेल्या मल्लखांब प्रकारात मात्र रूपाली हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तिची सहकारी जान्हवी जाधव हिने या प्रकारात रौप्यपदक पटकावले.महाराष्ट्राने या स्पर्धेतील पुरुष सांघिक विभागात रौप्य पदक; तर महिलांच्या सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकले होते