महाराष्ट्राच्या पुत्राचा चीनमध्ये डंका

अविनाश साबळेला सलग दुसरे पदक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य अशी सलग दोन पदके जिंकली. महाराष्ट्राच्या पुत्राने चीनमध्ये भारताचा तिरंगा दिमाखात फडकावत एक इतिहास घडवला आहे.

भारतीय लांब पल्ल्याचया धावपटू अविनाश साबळेने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. साबळेचे या खेळांमधील हे दुसरे पदक आहे. गेल्या आठवड्यात त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले. 29 वर्षीय भारतीय खेळाडूने 13 मिनिटे 21.09 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. बहारीनच्या बिरहानू यामाताव बालेव याने 13:17:40 या वेळेत सुवर्णपदक पटकावले, तर त्याचाच देशबांधव दाविट फिकाडू अदमासू याने 13:25:63 या वेळेत कांस्यपदक पटकावले. आणखी एक भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने 13:29:93च्या वेळेसह आपली सर्वोत्तम कामगिरी केली, परंतु तो चौथ्या स्थानावर राहिला.

अविनाश साबळेने 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:19:50 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8 मिनिटे 11.20 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले होते. अविनाश साबळेची हंगामातील सर्वोत्तम वेळ 8:11.63 आहे, ज्यामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानच्या मिउरा र्युजीच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.

Exit mobile version