। नेरळ । प्रतिनिधी ।
खेलो मास्टर्स गेम्समध्ये महाराष्ट्र्र राज्याच्या संघाने कबड्डीत महिला आणि पुरुष गटात तब्बल 5 सुवर्णपदके मिळविली आहेत. त्यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने 3 तर महिला संघाने 2 गटांत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
नोएडा येथील अक्षरधाम या इंटरनॅशनल मैदानावर खेलो मास्टर्स गेम्स भरविण्यात आले होते. या स्पर्धेतील कबड्डी खेळात महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा बाजू मारली आहे. तेथील कॉमन वेल्थ सेंटरमध्ये झालेल्या कबड्डीच्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत 50+ मध्ये तामिळनाडू संघाचा, तर 40+ गटामध्ये हिमाचल प्रदेश आणि 30+ गटात दिल्ली संघाचा पराभव करून विजय मिळविला आहे. या संघाचे नेतृत्व गुरुनाथ पाटील यांनी केले. तर, महिला संघाने 40+ आणि 30+ गटात अंतिम फेरीत बाजी मारून सुवर्णपदक मिळविले. महिला संघाने 40+ गटामध्ये हिमाचल प्रदेश आणि 30+ संघाने हरियाणा संघाचा पराभव केला. महिला संघाचे नेतृत्व लता शर्मा यांनी केले.