। खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असो. संल्गन रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असो. यांच्या मान्यतेने व खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असो. यांच्या सहयोगाने बुधवारी (दि.16) शरीसौष्ठव स्पर्धेचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील पटांगणात करण्यात आले होते. यावेळी दिपक ब्रदर्स आयोजित कर्जत-खालापूर श्री 2025चा मानकरी मुंबई पोलीस रोशन खाडे हा ठरला आहे. तर बेस्ट पोझर शिवतेज ठाकरे व बेस्ट बॉडी इम्प्रुव्हमेंट सलमान नालबंद यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधारकर घारे, शेकाप नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, खोपोलीचे पोलीस निरिक्षक शीतल राऊत, खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, डॉ.सुनील पाटील, मोहन औसरमल, किशोर पानसरे, प्रमोद महाडिक, दिपक गायकवाड, किशोर पानसरे, समीर मसुरकर, शेकापचे नेते रविंद्र रोकडे, सेनेचे दिलीप पुरी, हिशाल गायकवाड व रमेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.