| नागोठणे | प्रतिनिधी |
अलिबागचे सुपुत्र, कोकणातील ग्रामीण भागातून मुंबईत येऊन शिक्षण घेणारा युवक, हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि, अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून मपी.एच.डी.फ मिळवणारे तत्वज्ञानी, थोर देशभक्त, शहीद भगत सिंगांच्या अंतरंगातील कडवे क्रांतिकारक, 4 वर्षे भूमिगत राहून हिमालयामध्ये (भारत व तिबेट) सर्वदूर व अगम्य ठिकाणी पदभ्रमण केलेला, सद्गुरूंचा शोध घेणारे साधक-यात्री अशी प्रचंड ओळख असलेल्या महर्षी न्यायरत्न विनोद यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी अलिबाग येथील जे. एस्. एम्. कॉलेजमध्ये करण्यात आले आहे.सिद्धाश्रम सेवा मंडळ व गणराज प्रबोधन मंडळ,अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. होणार आहे. खुल्या गटाच्या या वक्तृत्व स्पर्धेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यात मानवी जीवनावर होणारा परिणाम , श्री राम चरित्रातून आपण काय शिकावे?., ज्येष्ठ नागरिक ही समाजाची संपत्ती की जबाबदारी?, नियंत्रणहीन दृकश्राव्य माध्यमांचा समाज मनावर होणारा परिणाम , लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांचे योगदान या पाच विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या वक्तृत्व स्पर्धेच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ॲड. श्रीराम ठोसर 9823279046 व ॲड. सौ. अदिती वैद्य 9890863232 यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.