नांदगाव येथे महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन

| आगरदांडा | गणेश चोडणेकर |

श्री गुरु सावर्डेकर महाराज संस्थापित रुद्ररेवा सेवा प्रतिष्ठान आळंदी देवाची अंतर्गत श्री गुरुमाता सेवाश्रम विनामूल्य वृद्धाश्रम अनाथाश्रम नांदगाव येथे 14 ते 17 फेबुवारी 2026 या कालावधीत भव्य दिव्य महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन श्रीगुरू सावर्डेकर महाराजांच्या मार्गदर्शनाने विविध आध्यात्मिक संत महंत व राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपास्थितीत श्री गुरूमाता सेवाश्रम नांदगाव येथे संपन्न होणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर,नांदगाव येथे सेवाश्रम परिवारातील मान्यवरांच्या हस्ते पत्रिका पूजनाने महाशिवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला.

महाशिवरात्र महोत्सवात आगमोक्त यज्ञ, शिवपूजन, भजन, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान असे धार्मिक कार्यक्रम होतील. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्र या दिवशी सकाळी 10 वाजता श्री गुरुमाता सेवाश्रम येथून भव्य दिव्य पालखी सोहळा श्री अमृतेश्वर मंदिर येथे जाईल. रात्री 11:30 वाजता कीर्तनानंतर निशीथकालीन आगमोक्त शिवपूजन कार्यक्रमानंतर उपास्थित शिवभक्तांना वाराणसी येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग येथे सिद्ध केलेले रुद्राक्ष प्रसाद भेट देण्यात येतील. या महोत्सवात दिलीप महाराज ठाकूर, अंकेश महाराज पाटील, संजय बाळकृष्ण ठाकूर या मान्यवरांची प्रवचने व्याख्याने व अनंत महाराज मेंदाडकर सर दिघी, श्रीगुरू बाबा महाराज ढवळीकर पंढरपूर, मदन महाराज नेवरेकर जीवना व श्रीगुरु माऊली महाराज सावर्डेकर आळंदी देवाची यांची कीर्तन होतील 16 फेब्रुवारी 2026 या दिवशी सायंकाळी 5वा भव्य मशाल महोत्सव व दिपोत्सव हे कार्यक्रम होतील.17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी श्रीगुरू सावर्डेकर महाराजांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल. या महोत्सवाचे सर्व सज्जनांना प्रेमपूर्वक आमंत्रण. या महोत्सवात सर्व शिवभक्तांनी तन – मन – धनाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री गुरूमाता सेवाश्रम परिवार नांदगाव व श्रीगुरू सावर्डेकर महाराज शिष्य परिवार यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाचे व श्री गुरूमाता सेवाश्रमाचे ( विनामूल्य वृद्धाश्रम व अनाथाश्रम ) विनामूल्य संस्कार शिबीर, विनामूल्य वारकरी गुरुकूल शिक्षण संस्था, व्यसनमुक्ती समुपदेशन,आगमोक्त यज्ञ व धर्मकार्य विधी इत्यादी सेवा प्रकल्पाच्या माहितीसाठी सावर्डेकर महाराज – 9011239632, दिपेश पेरवे खारांबोळी – 7972444939, माताजी रश्मी राम पाटील मजगांव- 9209843191 यांच्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री गुरूमाता सेवाश्रम परिवारा तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version