माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान सुरु

| माथेरान | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार दि.14 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत येथे स्वच्छ तीर्थ मोहीम महास्वच्छता अभियान राबविण्या बाबत सूचित केले आहे. यामध्ये सर्व मंदिर परिसर पूर्ण स्वच्छ करणे, मंदिर परिसरात सजावट करणे तसेच विद्युत रोषणाई करणे, मंदिर पटांगणात सर्वत्र रांगोळी काढणे, मंदिर परिसरात गुढी उभारणे, सर्वत्रदिवे लावणे इत्यादी कामात सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करणे बाबत विनंती केली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

गावागावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन 22 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत माथेरान मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. महास्वच्छता अभियानांतर्गत गुरूवारी (दि.18) माथेरान शहरात मध्यवर्ती असलेल्या श्रीराम मंदिर परिसरात रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करत संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

Exit mobile version