| अलिबाग | विशेष प्रतिनीधी |
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचेवतीन ेमहास्वच्छता अभियान बुधवारी ( 1 मार्च) राबविण्यात आले. या महास्वच्छता अभियानात अलिबाग शहरांतील 20 कि.मी. रस्ते व 138000 चौ. फु. सरकारी कार्यालय व परिसर, 1.50 कि.मी. समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. 39.777 टन कचरा संकलित करण्यात आला.
प्रशासनाचाही सहभाग
या स्वच्छता मोहिमे मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,नपा मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, जि.प. अधिकारी निलेश घुले, श्री. भालेराव, श्री. मंडलिक जयंत गायकवाड व पोलीस विभागातील कर्मचारी यांचेसह विविध खात्याचे अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते.
या स्वच्छता अभियानात अलिबाग शहरातील शासकीय कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, वनविभागाचे कार्यालय, तहसिलदार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, अॅन्टीकरप्शन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, धर्मादाय आयुक्त, जिल्हा कोषागार इत्यादी कार्यालय परिसर स्वच्छ रण्यात आला. तसेच अलिबाग बस स्थानक व अलिबाग समुद्रकिना-याची स्वच्छता करण्यात आली.
महास्वच्छता अभियानामध्ये अलिबाग शहर स्वच्छता मोहिमेत 1975 श्रीसदस्य झाले होते. टेम्पो, ट्रक्टर, ट्रक घंटागाडी अशा एकूण 58 वाहनांच्या सहाय्याने अलिबाग शहरातील 20 कि. मी. मुख्य व अंतर्गत रस्ते, 138000 चौ. फुट कार्यालय परिसर, 1.5 कि.मी. समुद्रकिनारा येथून एकूण 39.770 टन कचरा संकलीत करुन अलिबाग नगरपालीका डंपींग ग्राऊंड येथे जमा करण्यात आला.