| पनवेल | प्रतिनिधी |
भदंत न्यान ज्योती महाथेरो यांच्या सामाजिक क्रांती अभियानाला सुरुवात झाली आहे. दादर येथील चैत्यभूमी ते भीमाकोरेगाव येथील शौर्यभूमी असे त्यांच्या धम्म पदयात्रेचे मार्गक्रमण आहे. दरम्यान, खांदा वसाहत येथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर खांदा वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून फुलांच्या पुष्पवृष्टीत पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. हे स्वागत येथील मूलगंध कुटी बुद्ध विहार येथे पार पडले. त्यानंतर बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर भदंत न्यान ज्योती महाथेरो यांनी उपस्थितांना प्रवचनाद्वारे सामाजिक परिवर्तन, समता व बंधुत्वाचा संदेश दिला. यावेळी खांदा वसाहतीतील बौद्ध बांधव, महिला वर्ग, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







