हल्लाबोल मोर्चावर मविआ ठाम

आघाडी नेत्यांच्या बैठकीत रणनिती
। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज यांचाविषयी सातत्याने होत असलेल्या अवमानाचा जाब राज्यकर्त्यांना विचारण्यासाठी आम्ही दि.17 डिसेेंबरला मुंबईत हल्लाबोल मोर्चा काढणार असून,सरकारला या मोर्चाला जाब द्यावा,असा निर्धार महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.मोर्चाला अनुमती मिळेलच असा दावाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

मोर्चाच्या तयारी संदर्भात गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी ( 15 डिसेंबर) मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती.पवारांशिवाय उद्धव ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण आदींसह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.यावेळी सीमा प्रश्‍नावरुन दिल्लीत झालेल्या बैठकीचे पडसादही उमटले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे अस्मितेला धक्का लागला असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोम्मईंवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी, अ अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘हो ला हो म्हणून आले’
अमित शाह यांनी काल बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु या बैठकीच काहीही घडलेलं नाही. केवळ आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हो ला हो म्हणून आले. बोम्मई यांचे ट्विटर हॅक झालं असेल तर ते बैठक संपल्यावरच का सांगितलं. खुलासा करायला इतके दिवस का लागले. यासंदर्भात कारवाई का केली नाही? जेव्हा गाड्या फोडल्या जात होत्या, लोकांना ताब्यात घेतलं जात होतं ते तर प्रत्यक्षात होतं. ट्विटरवर नव्हतं. तेव्हा काही सुचलं नाही का?फफ असे प्रश्‍न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. जे ठरलंय त्याप्रमाणे कर्नाटकने वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं.

अजित पवार,विरोधी पक्षनेते
Exit mobile version