हजारो कार्यकर्ते झाले रॅलीमध्ये सहभागी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.29) संपूर्ण अलिबाग शहरात बाईक रॅली काढली. शेकाप भवन येथून सुरु झालेल्या या रॅलीत उमदेवारांसह हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह यानिमित्ताने पहावयास मिळाला. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आली.
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवकपदाचे उमेदवार आणि शेकाप व काँग्रेसचे पदाधिकारी हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूकीच्या प्रचारार्थ सायंकाळी त्यांनी बाईक रॅली काढली. प्रत्येकाच्या गाडीला शेकापचा लाल बावटा, काँग्रेसचा झेंडा लावून शेतकरी भवन येथून रॅलीला सुरूवात झाली. दुचाकी चालकाच्या मागे असलेल्या कार्यकर्त्याने हातात झेंडा घेऊन शेकापचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
शेतकरी भवन येथून सुरू झालेली रॅली ठिकरूळ नाका, शिवलकर नाका, खोजणी नाका, मांडवी मोहल्ला, जलसापाडा, शास्त्रीनगर, सिध्दार्थ नगर, पापाभाई पठाण चौक, बाजारपेठ, मारूती नाका, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर चौक, ब्राह्मण आळी, श्रीराम मंदिर, तळकरनगर, रामनाथ, महेश टॉकीज, चेंढरे येथील मारुती नाका, रायवाडी, श्रीबागमधील अंबा माता मंदिर, गणपती मंदिर त्यानंतर रॅलीचा शेवट पुन्हा शेतकरी भवन येथे झाला.
महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे प्रभाग दोनमधील उमेदवार प्रशांत नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नमिता प्रशांत नाईक, नगरसेवकपदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधूकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर, प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील, प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे, प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समिर मधूकर ठाकूर, प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्वीनी ठोसर, प्रभाग सातमधून ॲड, मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर, प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा, प्रभाग नऊमधून योजना प्रदिप पाटील, सागर शिवनाथ भगत, प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे उमेदवारांसह शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड.गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत आदी पदाधिकारी यांच्यासह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, तरुण मंडळी, महिला, तरुणी सहभागी झाले होते. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीतील उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीच जिंकणार असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, युवराज पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, रवि ठाकूर, पिंट्या तथा अमिर ठाकूर, अशोक प्रधान, सतिश प्रधान, नागेश कुलकर्णी, संदीप शिवलकर, ॲड. अशिष रानडे, अश्वीन लालन, अजय झुंजारराव, प्रकाश राठोड, इंद्रनील नाईक आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारांचे जल्लोषात स्वागत
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांच्यासह प्रभाग एक ते दहा मधील नगरसेवकपदाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अलिबाग शहरातून बाईक रॅली काढली.दरम्यान जिल्हा सार्वजनिक वाचनालय अलिबागच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून रॅलीला सुरूवात झाली. मारुती नाका, बाजारपेठ, रामनाथ, बालाजी नाका, कोळीवाडा परिसरात उमेदवारांचे मतदारांकडून जल्लोषात स्वागत करीत त्यांचे औंक्षण करण्यात आले.








