| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट)- भारतीय जनता पार्टी-आरपीआय यांची महायुती, तर राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना (उबाठा) व इतर पक्ष यांची परिवर्तन विकास आघाडी यांच्यामध्ये सरळ सामना होणार आहे.
नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट-भाजप आणि आरपीआय महायुती तर राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना (उबाठा)-शेकाप-काँग्रेस आदी पक्ष यांची परिवर्तन विकास आघाडी अशी लढत होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एकास एक अशी लढाई पाहायला मिळणार आहे. कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे व त्यांनी राष्ट्रवादीने घड्याळ निशाणीवर पंधरा उमेदवार उभे केले आहेत तर शिवसेना (उबाठा) यांनी इतर पक्षांनी मशाल चिन्हावर पाच उमेदवार उभे केले आहे. त्यापैकी एक उमेदवार अपक्ष हा शिवसेना पुरस्कृत आहे. त्याला रिक्षा निशाणी मिळाली आहे. परिवर्तन विकास आघाडीचे 21 उमेदवार तर महायुतीचे 21 उमेदवार असे 42 उमेदवार उभे आहेत तर कर्जत नगर परिषद मध्ये चार प्रभागात एकेक अपक्ष उमेदवार असे चार अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत 21 जागांसाठी एकूण 46 उमेदवार रिंगणात उभे आहेत.





