रेवदंडा येथे आघाडीच्या प्रचाराला सुरुवात

भाई जयंत पाटील व सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रेवदंडा येथे धडाकेबाज आणि शक्तिप्रदर्शनासह प्रचाराचा शंखनाद केला. रेवदंडा येथील पारनाका मारुती मंदिरात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया पाटील यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अत्यंत उत्साही झाले होते.

प्रचार सुरू करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवारांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेत आशीर्वादही घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप नेते द्वारकानाथ नाईक, सदाशिव मोरे, बाबू मोरे, महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, पंचायत समिती चौल-वरंडे उमेदवार अनया अमित फुंडे, रेवदंडा-नागाव पंचायत समिती उमेदवार राकेश म्हात्रे, शेकापचे शहराध्यक्ष निलेश खोत, सोनाली मोरे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, संदीप खोत, अमित फुंडे, सुरेश खोत, राजेंद्र ठाकूर, विजय ठाकूर, विजय चौलकर, अजित गुरव, निलेश म्हात्रे, मारुती भगत, निलेश गाडे, अशोक नाईक, तसेच काँग्रेसचे अशोक अंबुकर, आशिष गोंधळी यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी “महाविकास आघाडीचा विजय असो”, “महाविकास आघाडी जिंदाबाद”, “लाल बावटे की जय”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांमधून परिसर दणाणून टाकला. या धडाकेबाज सुरुवातीमुळे रेवदंडा व परिसरातील प्रचाराला जोर मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Exit mobile version