। रेवदंडा । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदीप नाईक उपस्थित होते.
दरम्यान, रेवदंडा येथे आ. जयंत पाटील यांचे आगमन होताच शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत गणपत, शरद वरसोलकर, सदाशिव मोरे, सुरेश खोत, कमळाकर साखळे, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा चुनेकर, ग्रा.पं. सदस्य राजन वाडकर, संतोष मोरे, संदीप खोत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आ. पाटील यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.