निसर्ग चक्रीवादळातील पडलेला पोल जैसे थेच
| श्रीवर्धन | वार्ताहर |
नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथील मैदानात निसर्ग चक्रीवादळात पडलेला पथदिव्याचा सिमेंट पोल अजूनही त्याच अवस्थेत असून, महावितरण कंपनीला जबाबदारीचा विसर पडल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पोलचे मधोमध दोन तुकडे झाल्याने पोलमधील लोखंडी शिघा बाहेर आलेल्या आहेत.दोन वर्षे पोल त्याच अवस्थेत असल्यामुळे शिगा गंजलेल्या अवस्थेत आहेत. पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी मैदानात खेळत असताना गंजलेल्या शिगा विद्यार्थ्यांना लागून इजा होण्याची शक्यता आहे. मोडतोड झालेला पोल त्वरित तेथून हलवावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.







