रहदारीच्या वेळी पडल्यास जीवितहानीची शक्यता
| उरण | प्रतिनिधी |
विद्युत वाहक लोखंडी खांब हे विद्युत तारा जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी वापरले जातात. मात्र, महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत विद्युत वाहक लोखंडी खांब हे सडलेल्या अवस्थेत उभे असल्याचे धोकादायक चित्र समोर येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय ही महत्त्वाची खाती आहेत. परंतु, त्या खात्यामधील ऊर्जा या खात्याकडे त्यांना लक्ष केंद्रित करण्याकडे वेळ मिळत नसल्याने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण येथील महावितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची किड लागली आहे.अनेक वेळा स्थानिक ग्रामपंचायत, रहिवासी नागरिक याकडून आपल्या परिसरातील वीजेच्या समस्यांबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.मात्र महावितरण कंपनीचे अभियंता, कर्मचारी हे जनमानसांच्या वीजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत.उलट महावितरण कंपनीचे अभियंता, कर्मचारी हे गोदाम मालक, बिल्डर यांना विद्युत पुरवठा सुरळीत कशाप्रकारे ठेवला जाईल याकडे आपली धडपड करताना दिसत आहेत.त्यामुळे उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून विद्युत वाहक लोखंडी खांब हे सडलेल्या अवस्थेत उभे असल्याचे धोकादायक चित्र समोर येत आहे.विद्युत वाहक लोखंडी खांब हे विद्युत तारा जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी वापरले जातात. असे धोकादायक सडलेले विद्युत वाहक लोखंडी खांब हे रहिवाशांच्या किंवा मुक्या जनावरांच्या अंगावर पडले तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
उरण तालुक्यातील कोणत्या गावात किती विद्युत वाहक लोखंडी खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत.त्याची माहिती घेतो आणि वरिष्ठांना तशा प्रकारचा अहवाल पाठवितो.
विकास गायकवाड,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय उरण






