पहिल्या लकी ड्रॉ मध्ये 200 विजेते; बक्षिसांचे वितरण करण्यास सुरूवात
। रायगड । प्रतिनिधी ।
महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने 7 एप्रिलला काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये कल्याण परिमंडलात पहिल्या क्रमांकाचे 40 तर दुसर्या क्रमांकासाठी 80 व तिसर्या क्रमांकासाठी 80 असे एकूण 200 विजेते जाहिर करण्यात आले आहेत. विजेत्या ग्राहकांची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येत आहे.
कल्याण परिमंडलात 40 उपविभाग असून, प्रत्येक उपविभाग स्तरावर एक या प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 40 विजेत्या ग्राहकांना सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन दुसर्या क्रमांकासाठी 80 विजेत्या ग्राहकांना रेडमी कंपनीचे स्मार्ट फोन व तिसर्या क्रमांकासाठी 80 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस देण्यात येत आहे. यापुढील लकी ड्रॉ मे व जून महिन्यात काढण्यात येणार असून आणखी 400 बक्षिसे जिंकण्याची संधी परिमंडलातील ग्राहकांना आहे.
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणार्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र आहेत. 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन किंवा तीन पेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पध्दतीने भरणार्या ग्राहकांना योजनेच्या लाभाची संधी आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही, अशा लघुदाब चालू (एलटी लाईव्ह) वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे.
रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरणचे मोबाईल अॅप विविध पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुलभ व सुरक्षित आहे. ऑनलाईन वीजबिल भरणा करणार्या ग्राहकांना त्यांच्या वीजबिलावर 0.25 टक्के सवलत देण्यात येते. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास ुुु.ारहरवळीलेा.ळप भेट देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.