। मुंबई । प्रतिनिधी ।
सुपर लीगमधील तिसर्या दिवशी ठाणे मराठाज संघाने शिवाजी पार्क वॉरियर्सवर धक्कादायक विजय मिळविला आहे. ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एम.सी.सी. आयोजित ही लढत तासभर उशिरा सुरु झाली आणि प्रत्येकी 17 षटकांचा खेळ खेळवण्यात आला.
शिवाजी पार्कने आक्रमक सुरुवात केली; परंतु, फार चालले नाही. वरून लवंडेने आक्रमक फटके (49) ठोकले. सिद्धांत सिंग (26), देव पटेल (18), आश्रय सजणानी (18) यांनी उपयुक्त योगदान दिले आणि 17 षटकांत 151 धावांचे लक्ष्य ठाणेसंघाला दिले. शिवाजी पार्कचा गोलंदाज अजित यादवने केवळ 18 धावांत 3 बळी घेतले. त्याला आदित्य राणे (35/3) आणि दिव्यांश सक्सेना (25/2) यांची साथ लाभली. लक्षाचा पाठलाग करताना ठाण्याचा शाश्वत जगताप (29) आणि ह्रिदय खांडके (19) यांनी 54 धावांची भागीदारी केली. सिद्धांत अधटराव (32) व चिन्मय सुतार (10) यांनी डाव सावरला. त्यांनतर अंतिम चेंडूवर विनय कुमारच्या (नाबाद 23) विस्फोटक षटकाराने विजय निश्चित केला. यावेळी शिवाजी पार्कचा देव पटेल व कार्तिक मिश्रा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, सामनाधिकारी सुरेंद्र नागवेकर यांच्या हस्ते सामनावीर म्हणून अजित यादव याचा गौरव धनादेश देऊन करण्यात आला.