महायुतीच्या जागा वाटपावर होणार शिक्कामोर्तब ?

| मुंबई | प्रतिनिधी |

महायुतीच्या जागावाटपावर येत्या दोन दिवसांत अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीतील तिनही पक्षांचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे. महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा येत्या दोन दिवसांत सुटण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी महायुतीच्या नेत्याची बैठक होणार आहे. त्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपने लोकसभेच्या 23 जागांवर निरीक्षकांची नेमणूक केल्याने विद्यमान खासदारांच्या 23 जागा लढणार असे संकेत दिलेत. तर शिंदे गटाकडून 22 जागांची मागणी केली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 10 ते 12 जागा हव्यात, अशी मागणी केली आहे. भाजपची यादी ठरली असून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवारही निश्चित झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version