स्थानिक नागरिकांना मंदिर समितीवर घेण्यास विश्वस्त समिती सकारात्मक
। रसायनी । राकेश खराडे ।
अष्टविनायकांपैकी एक स्थान असणार्या महड येथील श्री वरद विनायकाच्या मंदिर विश्वस्त समितीवर स्थानिक महड येथील ग्रामस्थांचे सदस्य असावेत अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती. याबाबत बैठक पार पडली होती.त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी ग्रामस्थ व मंदिर समिती यांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत ग्रामस्थ ठरवून देतील, त्या सदस्य समितीला समितीवर घेण्यासाठी सहकार्य करील असा तोडगा काढून निर्णय घेतल्याने कमिटीवर नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटणार आहे.
महड येथील श्री वरदविनायकाचे स्थान असल्याने या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भक्तगण येत असतात. त्यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने याबाबत अस्तित्वात असणार्या विश्वस्त समितीकडे मागणी केल्याने या ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार 30 सप्टेंबर रोजी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. यात मंदिर समितीवर स्थानिक सदस्य समितीवर घेण्यासाठी अस्तित्वात असणारी समिती सहकार्य करेल. यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ व मंदिर विश्वस्त समिती समन्वय साधून तयार करेल व जे कागदपत्र पुरावे लागणार असतील ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावेत त्याला कोणाचाच विरोध नसेल अशी भूमिका समितीने घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.