| खोपोली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना बेंच प्रेस स्पर्धेत महड गावातील दिनेश पवारने सुवर्ण पदक मिळविले आहे. या कामगिरीच्या जोरावर हाँगकाँग येथे होणार्या स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. याबाबत अभिनंदन होत असतानाच आपल्या महड गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचविल्याने दिनेशचा अभिमान असून, कौतुक आणि सन्मान करणे क्रमप्राप्त आहे, अशी प्रतिक्रिया श्रीक्षेत्र महड देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी वरदविनायक मंदिरात दिनेश पवार यांचा सन्मान करताना दिली.
संभाजीनगर येथील गारखेडा येथे विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धा दि. 18 जानेवारी रोजी पार पडली होती. या स्पर्धेत देशभरातून असंख्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यादरम्यान मास्टर गटाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व खालापूर तालुक्यातील महड गावातील दिनेश पवार याने केले. विरोधकांना धुळ चारत सुवर्णपदक पटाकवले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची हाँगकाँग येथील इंटरनँशनल बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत दिनेश पवार यांस आर्थिक सहाय्याचे धनादेश देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी मोहिनी वैद्य, विश्वस्त सिध्दार्थ जोशी, किरण काशीकर यांच्यासह मंदिरातील सेवक उपस्थित होते.