| खोपोली | प्रतिनिधी |
जय महालक्ष्मी सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने बीडखुर्द गावात नवरात्रौत्सवात माहेरवाशिणींचा सन्मान सोहळा शनिवार, दि.27 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. सन्मान सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल अशा विविध शहरांतून 80 ते 90 माहिरवाशींनी आपल्या माहेरात आल्या होत्या. यामध्ये अबालवृध्दांचा समावेश होता. जय महालक्ष्मी सेवा संस्थेच्यातीने आयोजित कार्यक्रमात भावांनी बहिणी आणि आत्यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले आहे. खालापूर तालुक्यातील बीडखुर्द गावात जय महालक्ष्मी सेवा संस्था मागील 24 वर्षांपासून नवरात्रौत्सवासह विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवत असते. यंदा संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली. नवरात्रीत माहेरवाशिणींचा ओटी भरून सन्मान करणे, हे भारतीय संस्कृतीत स्त्रीत्वाचा, तिच्या मातृत्वाचा, सौभाग्याचा सृजनशील शक्तीचा आदर गौरव करण्याचा एक पारंपरिक मार्ग आहे अशी भावना लक्षात घेऊन आपल्या माहेरवाशीण लेकींचा सन्मान करण्याची संकल्पना जय महालक्ष्मी सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडवकर, अनंता मांडवकर, उपाध्यक्ष संतोष तेलिंगे, खजिनदार राकेश सुगदरे, सहखजिनदार तेजेस काशिद, सहसचिव सुजित तेलिंगे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी राबवत आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होती.
माहेरवाशिणींचा भावांकडून सन्मान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606