श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारीपदी महेश पाटील

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारीपदी महेश पाटील यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. दरम्यान, अमित शेडगे यांची बदली झाल्यापासून गेले काही महिने श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दीपा भोसले यांच्याकडे होता.

भंडारा येथून महेश पाटील यांची श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून, त्यांनी दि. 1 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारला आहे. श्री. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील असून, त्यांचा महसूल खात्यांतील विविध पदांवरील दांडगा अनुभव आहे. त्यांनी रत्नागिरी येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. तसेच गुहागर, ओरोस येथेही त्यांची सेवा झाली आहे. त्यांनी कुडाळ, माण येथेही तहसीलदार म्हणून काम केले आहे. तद्नंतर त्यांनी तहसीलदार (निवडणूक) या पदावर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे काम केले आहे. तसेच तहसीलदार म्हणून सोलापूर येथे व जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर गडचिरोली व रत्नागिरी येथे काम केले आहे.

Exit mobile version