| श्रीवर्धन | वार्ताहर |
आय.क्यू.ए.सी. आणि करिअर गायडन्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन तालुक्यातील आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी श्रीवर्धनच्या गोखले महाविद्यालयात दि. 28 व 29 सकाळी 10.30 वाजता दोन दिवसीयय पोलीस भरतीपूर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, तहसिलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.