माही फायटर्स संघ ठरला महाविजेता

| खांब | प्रतिनिधी |

प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान संलग्न कोलाड ग्रामीण क्रिकेट असो.च्यावतीने रबर बॉल प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माही फायटर्स हा संघ माहाविजेता ठरला आहे.

क्रिकेट खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी व ग्रामीण भागात देखील दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीने प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान संलग्न कोलाड ग्रामीण क्रिकेट असो.च्यावतीने नेहमीच क्रिकेट क्रीडा विश्वात विविधांगी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने चालू पावसाळी हंगामात या प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या लीगमध्ये मोठ्या संख्येने क्रिकेट संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेत मोठा उत्साह निर्माण केला होता. तर, अंतिम सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारा व कोलाड ग्रामीण क्रिकेट असो. अध्यक्ष असलेल्या महेश बामणे यांच्या माही फायटर्स संघाने विजेतेपद पटकावले तर संगमेश शेठ हदीमणी संघमालक असलेला श्री दत्त 11 किंग खैरवाडी हा संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून मनिष पार्टे, उत्कृष्ट फलंदाज ओंमकर घाग, उत्कृष्ट गोलंदाज प्रणव मरवडे तर क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन शेटवे यांना तसेच विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version