दागिने चोरून मोलकरीण पसार

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर येथील घरातून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून मोलकरीण पसार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर येथे राहणाऱ्या तक्रारदार यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेने घरात कोणी नसल्याची संधी साधत तिच्याकडील चावीचा वापर करून त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम आणि चार तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. ही बाब घर मालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तिचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version