कर्जतमधील आदिवासीवाड्यांचा संपर्क तुटला

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत आसल हद्दीतील भुतिवलीपासून माथेरानच्या डोंगर रांगेत येणाऱ्या सात आदिवासीवाड्यांना जोडण्याऱ्या मुख्य रस्त्यावर पाच जुलै रोजी झालेल्या मुसधार पावसामुळे या रास्तावर दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे बंद होऊन येथील सात आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी संपर्क तुटला. परिणामी या आदिवासी वाडीतील लोकांना पर्यायी रस्ता म्हणून डोंगर रांगेतून प्रवास करावा लागत असल्याने यांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

पाळी भूतीवली धरणाच्या समोर असलेल्या सात आदिवासीवाड्यांना जोडणारा रस्ता बंद झाला आहे. या सर्व घटनेची माहिती कर्जत तालुक्याचे प्रांत आधिकारी व तहशीलदर, गरविकास अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणांना यांच्यापर्यंत पोचल्याने तात्काळ ही सर्व शासकीय यंत्रना घटनास्थळी पोचली व संबंधीत सर्व घटनेची पाहणी करून या रस्त्यावर आलेला सर्व मलबा जेसीबीच्या साहाय्याने तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, हा मलबा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोकलनची गरज असल्याने या कामात संबंधित यंत्रणा या ठिकाणी पोहचू शकत नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. या प्रकरणामध्ये सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे हा रस्ता नेमका कोणत्या विभागामध्ये येतो, याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट उत्तर नसल्याचे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची नोंदीत नसल्याचे बोलण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही ते आमाच्याकडे नोंद नसल्याची बोलण्यात आले. दुर्गम भागातील आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना जीव धोक्यात असताना प्रशासन ‘रस्ता कोणाचा’ यावरच अडकून राहिले आहे.

Exit mobile version