शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय ठेवा- प्रकाश संकपाळ

। कर्जत । वार्ताहर ।

सण साजरे करताना शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय असला पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आगामी येणार्‍या सणानिमित्त कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोज केले होते. तहसिलदार यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत कर्जत शहरातील विज, पाणीपुरवठा शहरातील रहदारी आदी समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राजकीय प्रतिनिधी, व्यापारी, नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते. बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे, तहसीलदार धनंजय जाधव, अप्पर तहसीलदार दुर्गा देवरे, नायब तहसीलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड, माथेरान सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनवणे, कर्जत नगरपरीषदचे मुख्याधिकारी वैभव गारवे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे आदी उपस्थित होते.

सण जवळ आले आहेत. शहरातील रहदारीची समस्या मोठी आहे, विज प्रवाह सारखा खंडित होत आहे, नगरपरिषद हद्दीत पाणी पुरवठा अनियमित होत आहे, उल्हास नदीवरील छोट्या पुलाखाली झडपा टाकल्या पाहिजेत, अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या समस्यांवर सणांपूर्वी उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सकपाळ यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले.

Exit mobile version