| रसायनी | प्रतिनिधी |
केंद्रप्रमुख जे.पी. परदेशी यांच्या संकल्पनेतून रसायनी पाताळगंगा परिसरातील माजगाव केंद्रातील राजिप तळवली शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे. कार्यक्रमाचे उद्घाटन खालापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी दीपा परब यांच्या हस्ते झाले. या केंद्रस्तरीय स्पर्धेत 9 शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात लहान व मोठा गट असून सांघिक खेळ कबड्डी, लंगडी, आणि वैयक्तिक खेळामध्ये धावणे, लिंबू चमचा, पोते उड्या, दोरीवरच्या उड्या, बेडूक उड्या इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रस्तरीय स्पर्धेत 9 शाळांनी सहभाग घेतला होता. या क्रीडा स्पर्धेत लहान गट व मोठा गट असून त्यात सांघिक खेळ कबड्डी, लंगडी, आणि वैयक्तिक खेळामध्ये धावणे, लिंबू चमचा, पोते उड्या, दोरीवरच्या उड्या, बेडूक उड्या इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास आणि बिर्ला कार्बन युनिट हेड रविंद्र रघुवंशी यांच्यासह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सामन्यानंतर सर्व विजेत्या मुलांना बक्षीस देऊन आभार मानून कार्यक्रमाची सांगत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख जे. पी. परदेशी यांनी केले. तर, सूत्रसंचालन मस्तान बोरगे यांनी केले.







