खोपोलीत ‌‘माझी माती माझा देश’ अभियान

| खोपोली | प्रतिनिधी |

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात ‘मेरी माती मेरा देश’ होत आहे. त्याअनुषंगाने सकाळी 11 वा. अग्निशमन केंद्र, खोपोली येथे पंचप्राण शपथ कार्यक्रम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांनी सर्वांना शपथ दिली. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी व माजी सैनिक, माजी नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, शेडवली खोपोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक मोहन औसरमल, सुनिल पाटील, अमोल जाधव, नगरपालिकेचे अधिकारी प्रविण भोये, निशिकांत सुर्वे यांच्यासह शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नमन करण्यासाठी अभियान राबविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासक अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंचप्राण शपथ, वसुधावंदन, वीरों का वंदन यासारखे उपक्रम खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील स्थानिक शुरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक उभारले जाणार आहे.

Exit mobile version