चारचाकी व बसचा भीषण अपघात; सुदैवाने जिवितहानी टळली

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महामार्गावर दररोज अपघात होत असल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अपघातांची सुरू असलेली ही मालिका थांबण्याचे नावच घेत नाही. त्यातच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर चारचाकी व बसचा भीषण अपघात झाला.

बीएमडब्ल्यू आणि एस टी महामंडळाच्या बसमध्ये हा अपघात झाला. मंगळवारी (दि.१७) पहाटे साडेपाचच्या दरम्यान मुंबई लेनवर अपघात झाला असून या गाडीमध्ये आमदार संग्राम जगताप होते. ही घटना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. असून सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

दोन्ही वाहने आय आर बी पेट्रोलिंग यंत्रणेच्या माध्यमातून बाजुला सुरक्षित ठिकाणी घेतली. तसेच महामार्ग वाहतूक पोलीसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे.

Exit mobile version