मोठी दुर्घटना! गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवासी बोट बुडाली; आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

सायंकाळची वेळ, तुफान गर्दी, पर्यटकांना एलिफंटा लेण्यांचे वेध तर स्थानिकांना घराकडचे…गेट वे ऑफ इंडियाजवळून नीलकमल बोट करंजाच्या दिशेने निघाली. समुद्राच्या लाटांचा आणि निसर्गाचा आस्वाद घेत पर्यटक हरवून गेले होते. मात्र अचानक नेव्हीच्या बोटने नीलकमल बोटीला धडक दिली आणि क्षणात 87 प्रवासी प्रवास करीत असलेली बोट समुद्रात बुडाली. प्रवाशांचा आक्रोश अन् किंकाळ्या ऐकून अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला.

मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटीपैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली. या बोटीमध्ये 87 प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहेे. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 66 जणांचे रेस्न्यू करुन वाचविण्यात आले आहे. सात ते आठ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. नौदलाच्या 14 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे.

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी (दि.18) दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटीपैकी एका बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. त्यानंतर बोट उलटली. नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी सांगितले की, नेव्हीची स्पीड बोट आली. तिने बोटीला राऊंड मारला. त्यानंतर ती गेली. त्यानंतर पुन्हा ती बोट आली. त्या बोटीने नंतर नीलकमल बोटीला धडक दिली. उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीमध्ये 80 प्रवासी होते. उरण, करंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीच्या दुर्घटनेसंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन नव्हे तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाने दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी अंतिम नसून, यामध्ये अद्याप कुणी बेपत्ता असेल किंवा मृत असेल त्याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. ज्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

Exit mobile version