छत्तीसगडमध्ये जवानांकडून मोठी कारवाई; आठ नक्षलवादी ठार

चकमकीत एक जवान शहीद

। छत्तीसगड । वृत्तसंस्था ।

छत्तीसगडमध्ये अबुझमाडच्या कुतुल जंगलात नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांदी ठार झाले. तर एक जवान शाहिद झाला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर छत्तीसगड आणि गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमकी सुरू झाल्या आहेत. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात माओवादी आणि जवान यांच्यात चकमक सुरू आहे. माओवाद्यांना जवानांनी घेरल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड गोळीबार सुरू आहे. या चकमकीत जवानांना आठ माओवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तसेच, या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.

दरम्यान, जवान आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक सुरू आहे. मात्र, अतिदुर्गम भाग असल्याने जवानांशी संपर्क होऊ शकत नाही.

Exit mobile version