बाळाराम पाटील यांना विजयी करा

शरद पवार यांचे आवाहन
| मुंबई | प्रतिनिधी |
कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे उभे असलेले शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा विजयी करावे,असे आवाहन राष्ट्रवादी अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले आहे. बाळाराम पाटील यांनी मुंबई येथील निवासस्थानी पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी उभयतांमध्ये मतदारसंघातील व्यूहरचनेवर सखोल चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी आ. बाळाराम पाटील हे गेली सहा वर्षे सातत्याने विधानपरिषदेमध्ये आवाज उठवत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आहे. त्यामुळे अशा शिक्षकाभिमुख उमेदवाराला मतदारांनी पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

Exit mobile version