| मुंबई | वार्ताहार |
आगामी टी-20 पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी, अशी प्रतिक्रिया माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली आहे. बीसीसीआयने याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये महेंद्र सिंग धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. तशाच प्रकारे भविष्यातही अशा निर्णयांची अमलबजावणी होणे गरजेचं आहे, असं रवी शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं.