अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

शेकापची मागणी; तहसीलदारांना निवेदन
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागसह संपुर्ण रायगडमध्ये पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे भातशेती तसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांनी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग सहचिटणीस अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती संतोष पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, ॠषीकेश नाईक(सारळ ग्रामपंचायत), जेष्ठ कार्यकर्ते जनार्दन शेळके, युवा कार्यकर्ते – रितेश चौलकर, रोहित पाटील, अनिश मिठागरी उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस मनोज भगत यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरुड तहसीलदार यांना एक निवेदन सादर करण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, मनोहर बैले, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागावकर, चंद्रकांत कमाने, निता गिदी, विजय गिदी, संतोष पाटील, अजित कासार, सी.एम.ठाकूर, खार अंबोली सरपंच संतोष मोकल, बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, रमेश दिवेकर,विद्याधर चोरघे, महादेव गायकर, नंदकुमार धारवे, रघुनाथ ठाकूर, मुबस्सिर लालसे, विकास दिवेकर, महेंद्र आंबटकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही करावी यासाठी रोहा तहसिलदार कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसिलदार राजेश थोरे यांना निवेदन दिले आहे. जिल्हा चिटणीस मंडळातील ज्येष्ठ सदस्य अनंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक गणेश मढवी, जितेंद्र जोशी, जीवन देशमुख, लियाकत खोत, गणेश खरीवले, पिंट्या पार्टे, अमोल शिंगरे, नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी निवेदनातुन शेतकर्‍यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील दोन वर्षांपासून कोरोना, चक्रीवादळे, अतिवृष्टी या संकटांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यातच 5 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे कापणी केलेले भात तसेच शेतात उभे असलेले भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठया व बागायतदारांचे प्रमाणवर नुकसान झालेले आहे. सदर झालेल्या अवकाळी वादळी पाससामुळे शेतकर्‍यांच्या तसेच बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्याची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनतुन तहसीलदारांकडे मागणी कराण्यात आली आहे.

Exit mobile version