| मलकापूर | प्रतिनिधी |
प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे महायुतीत सहभागी आहेत. असे असतानाही रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे या आपल्या प्रचारात केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात. मात्र, रावेर मतदारसंघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावळलं जात आहे, असा आरोप प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच, मलकापूर येथे पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याचे आवाहनही प्रहारच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत महायुतीमधील हा वाद रावेर मतदारसंघात उफाळून आला आहे.
यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. परिणामी याचा फटका उमेदवार रक्षा खडसे यांना बसतोय का? की हा वाद शमवण्यासाठी उच्च पातळीवर काही घडामोडी घडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.