। चिरनेर । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून विकासात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. या उरण मतदार संघात शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांच्या निष्ठेने शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची ताकद दाखवून शेकापक्षाचे विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन ममता म्हात्रे यांनी केले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांच्या चिरनेर येथील निवासस्थानी मंगळवारी (दि.12) शेकापच्या महिला व पुरुष प्रमुख कार्यकर्त्यांची निवडणुकीच्या नियोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. यापुढे ममता म्हात्रे यांनी म्हटले की, अवघ्या काही दिवसांवर आलेली ही विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सध्याचे घाणेरडे राजकारण पाहता आपल्याला आपला पक्ष अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने काम करून ही निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढवून, प्रीतम म्हात्रे यांना विजयी करायचे आहे. असे आवाहन करून, त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांवर नियोजनाची जबाबदारही टाकली आहे. यावेळी उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील, संध्या पाटील, पार्वती कातकरी, अक्षता खारपाटील, शेकापचे उरण तालुका सहचिटणीस सुरेश पाटील, प्रफुल्ल खारपाटील, अरुण पाटील, दीपक कातकरी, नितीन म्हात्रे, अनिल पवार, अरुण शिंदे, प्रशांत खारपाटील, वसंत म्हात्रे, अनंत नारंगीकर, वैभव मोकल, शकुंतला पाटील, शोभा पाटील, भारती मोकल, रवीना मुंबईकर, अमित मुंबईकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.