शेकापचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन यशस्वी करा

जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यांचे आवाहन
| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे येत्या 2ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात येणार असून अमृतमहोत्सवी वर्षातला हा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सहभागी व्हा,असे आवाहन जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी सोमवारी( 18 जुलै) पनवेल येथे केले.

पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात वर्धापन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार धैर्यशील पाटील, आम. बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, सुरेश खैरे, प्रदीप नाईक .मुंबई कृषिउत्पन्न बाजार समिती सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, नारायणशेठ घरत, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक रविंद्र भगत, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके,अ‍ॅड. सचिन जोशी आणि पनवेल मधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड.आस्वाद पाटील म्हणाले की, या वर्धापन दिनाला तालुका प्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहोत. ते पुढे म्हणाले या पुढे ज्यांना नावाने निमंत्रण येईल त्यांनीच बैठकीला यावे जेणेकरून पक्षाची शिस्त मोडली जाणार नाही. आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले वर्धापन दिनानिमित्त आपण प्रतिज्ञा करूया की. येणार्‍या पनवेल महानगर पालिकेवर शेकाप चा झेंडा फडकवू. तसेच गेल्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी महापूर आला होता तेव्हा आपण शेकाप तर्फे भरीव काम केली आहेत. गेल्या वर्षी आपला वर्धापन दिन उरण येथील फुंडे हायस्कुल येथे मोजक्या कार्यकर्त्यांत साजरा केला परंतु ओनलाईन मध्ये सुमारे 20000, नागरिकांनी भाग घेतला होते.

या वर्धापन दिनी पनवेल मधील सर्वांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात येऊन येथे झेंडावंदन करून पुढे जायचे आहे असे सांगितले .या वेळी शेतकरी कामगार पक्ष पनवेल विभागाच्या वतीने वर्धापन दिनासाठी पाच लाख रुपयाचा निधी जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे संपूर्द करण्यात आली प्रास्ताविक पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांनी केली.तर आभार प्रदर्शन शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी केले.

Exit mobile version