अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करा; आ. जयंत पाटील यांची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ७ जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी सदरचे निवेदन त्यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, अलिबाग हे पर्यटन स्थळ मुंबई जवळ असल्याकारणाने सध्याच्या काळात पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात ये-जा होत आहे. या पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वहानांची कोंडी होऊन पर्यटकांचेही हाल होत आहेत. अलिबाग ते

वडखळ हा रस्ता अरुंद आहे त्यामुळे मुंबईहून तसेच अलिबागहून ये-जा करणाऱ्या वहांनाची कोंडी वाढत आहे.
अलिबाग येथील वाढते आकर्षण लक्षात घेता. पर्यटकांच्या दृष्टीने अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्यात यावा जेणे करुन नागरिकांना वहातुकीच्या समस्यांना काही अंशी दिलासा मिळेल.

सदर रस्ता दुपदरी करण्याकरिता आवश्यक असणारी जमिन ही विशेषतः शासकीय मालकीची आहे. त्यामुळे खाजगी जागेचे हस्तांतरण करण्याचीही आवश्यकता नाही.
त्यामुळे अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्याच्या योजनेचा विचार करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Exit mobile version