कुरूळ येथील समाज मंदिरात कार्यक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरूळ येथील समाज मंदिर येथे दि.14 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून हिंदु चौकळशी माळी संक्रांत मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या समारंभाला अध्यक्ष श्री. विकास अ. पाटील, उपाध्यक्ष श्री. राजाराम ग. राऊत, सह. सचिव विठोबा स. पाटील, सचिव-श्री. परशुराम ल. पाटील व खजिनदार श्री. सुधाकर ज. म्हात्रे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विशेष सल्लगार म्हणून अॅड. प्रसाद शां. पाटील हे आले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विजय विठोबा पाटील यांनी केले. या कार्यक्रमामध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त व जमा खर्च वाचला. दसरा फंड व मकर संक्रांतीची रक्कम जमा केली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमामध्ये 10 वी मधील दिप शैलेंद्र मगर, वेश्वी, 85.60 टक्के, प्रथम, पर्णवी दिनेश पाटील, कुरूळ, 85.60 टक्के, प्रथम, सानिका बाळकृष्ण पाटील, नवेदर बेली, 84 टक्के, द्वितीय, शमिका राजेंद्र म्हात्रे, वेश्वी, 82.40 टक्के, तृतीय, 12 वी विज्ञान मधील सुयोग सुधीर नाईक, बेलकडे, 95.83 टक्के, प्रथम, अथर्व विनोद नाईक, बेलकडे, 94.83 टक्के, द्वितीय, वेदांत विजय पाटील, कुरूळ, 94.17 टक्के, तृतीय, सुजय महेश पाटील, कुरूळ,92 टक्के, चतुर्थ, 12 वी वाणिज्य मधील सेजल शैलेंद्र मगर, वेश्वी, 84.50 टक्के, प्रथम, प्रज्व्ल भालचंद्र पाटील, नवेदर बेली, 68.67 टक्के, द्वितीय, प्रिया मधुकर पाटील, नवेदर बेली, 66.87 टक्के, तृतीय, 12 वी कला मधील जान्हवी दिलीप पाटील, वेश्वी, 68 टक्के, प्रथम, 15 वी बी.एस.सी मधील श्रावणी योगेश मगर, वेश्वी, 9.75 गुण, प्रथम, पुजा मधुकर पाटील, नवेदर बेली, 8.50 गुण, द्वितीय, आसावरी हरिश्चंद्र पाटील, बेलकडे, 7.80 गुण, तृतीय, कृणाल अजय पाटील, कुरूळ, 7.33 गुण, चतुथ, एल.एल.बी मधील शैलेश पांडुरंग पाटील, बेलकडे, प्रथम श्रेणी, प्रथम, आिउती रविंद्र पाटील, कुरूळ, प्रथम श्रेणी, प्रथम, मानसी महेश माळी, वेश्वी, प्रथम श्रेणी, प्रथम. एम. कॉम मधील रुपल रमेश पाटील, बेलकडे, प्रथम श्रेणी, प्रथम, सोनाली उमेश पाटील, बेलकडे, द्वितीय श्रेणी, द्वितीय, बी.ई. केमिकल मधील प्रज्वल विकास पाटील, बेलकडे, 67.4 टक्के, प्रथम, डिप्लोमा कोर्स मधील तन्मयी जयवंत राऊत, नवेदर बेली, प्रथम श्रेणी, प्रथम, विशेष प्राविण्य गटात गौरी विवेक नाईक, कृषी पदविका, बेलकडे, 8.32 गुण, प्रथम, जनरल नॉलेज परिक्षेत आरुष समीर म्हात्रे, कुरुळ, प्रथम, स्कॉलरशिप परीक्षेत श्रेयश महेंद्र पाटील, कुरुळ, प्रथम यांना पारितोषिक वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये मास्क लावा, हात सॅनिटाईझ करून सतत स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा हे संदेश देण्यात आले.







