| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयातील शासकिय निवासी शाळेतील 12 वर्षीय मुलासोबत त्याच शाळेतील दोन 14 वर्षीय मुलांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महिला व शाळकरी मुली सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील या घटनेंतर रायगड जिल्ह्यातदेखील दोन मुलांनी एका मुलावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती माणगांव पोलिसांनी दिली आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी रात्री घडल्याचे समोर येत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिडीत व अत्याचार करणारे अल्पवयीन असल्याने त्यांची वैद्यकिय तपासणी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे.