पनवेल | वार्ताहर |
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. करंजाडे वसाहतीमध्ये राहणारा रुपेश बाबासाहेब खाकाळ (36) रंग सावळा, उंची 16.5 से.मी. अंगाने मजबूत, केस काळे व बारीक, डोळे काळे असून अंगात फिक्कट निळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, काळ्या रंगाची साधी पॅन्ट घातलेली आहे. तसेच पायात ब्राऊन रंगाची चप्पल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.व्ही.बी.गावडे यांच्याशी संपर्क साधावा.