। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदारसंघात गेले अनेक वर्ष पुरुष उमेदवारांनीच वर्चस्व गाजवले आहे. यामुळे अनेक महिलांचे प्रश्न अनेक वर्षापासून आवाचून उभे राहिलेले आहेत. यामुळे येथील महिला वर्गाच्या प्रश्नांसह सक्षमीकरण व सबलीकरणासाठी या मतदारसंघातून एक महिला उमेदवार विजयी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच, बचत गटांना न्याय देत त्यांच्या उत्पादनाला स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्याचे काम हे फक्त स्नेहल जगतापच करू शकतात. यासाठी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर दाखवलेला विश्वास हा सार्थकी करण्यासाठी स्नेहल जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन महिला शिवसैनिक मनाली पोरे यांनी कृषीवलशी बोलताना केले.
शिंपी आळी बाजारपेठेतील डोंगरे गल्ली परिसरासह शुक्रवारी (दि.15) शिवाजी चौक परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीला पुष्पलता जगताप, संजय जगताप, विजय जगताप, शितल जगता यांच्या समावेत मनाली पोरे, अक्षय हेलेकर, राजा मुळे, अजिता मुळे, रुचिता मुळे, पाटेकर, रेवा मुळे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.