| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील तळा-मांदाड-आगरदांडा या रस्त्यावरील मांदाड पुल (खाजणी) रस्त्या दरम्यान अंदाजे 1 कि.मी. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालक, पर्यटक व प्रवासी वर्गातून सदर रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तळा तालुक्यासाठी सहा तालुक्यांना जोडणारा हा मांदाड पुल असून या पुलावरून मुरूडकडे अनेक प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना श्रीवर्धन-मुरुड असा हा जवळचा मार्ग असल्याने अनेक पर्यटक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, या मार्गावर मांदाड गाव ते पुलापर्यतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकाला वाहन चालविताना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागते. त्यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे त्वरीत भरून डागडूजी करावी व सदर रस्ता होण्यास ज्या कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करून या रस्त्याचे काम त्वरीत व्हावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मांदाड रस्त्याची दुरवस्था
