मांदय शिवा जैतू 102 व्या वर्षी कालवश

आमदार जयंत पाटील यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नवगाव गावातील मांदय शिवा जैतू यांना वयाच्या १०२ वर्षपूर्तीनंतर त्यांच्या राहत्या घरी नवगाव येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजून ४५ मिनिटात देवाज्ञा झाली. मांदय शिवा जैतू यांनी आयुष्यभर कष्ट करून मच्छी विकून आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले व त्यांना चांगल्या मार्गाला लावले आहे. त्यांचा सर्वात छोटा मुलगा रमाकांत शिवा जैतू उर्फ जैतू शेठ हे सरकारी खात्यात ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत तर त्यांची पत्नी वंदना रमाकांत जैतू या इंडीयन नेव्ही मध्ये नवसेना विभागात अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. मांदय जैतू यांच्या निधनाची बातमी कळताच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी तत्काळ कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मांदय शिवा जैतू यांच्या मृत्यू पश्चात त्यांची मुले जयंद्ररथ शिवा जैतू, रघुनाथ जैतू, रमाकांत जैतू उर्फ जैतूशेठ, सूना – जनाबाई जैतू, यमुना जैतू, वंदना जैतू तर मुली अंजनी लक्ष्मण शास्त्री असा मोठा परिवार आहे. तसेच मांदय जैतू यांनी वयाची १०२ पूर्ण करीत असताना आपल्या कुटुंबीयांमध्ये नातवंड, पणतू, खापरपणतू या सर्व पिढ्यान् पिढ्यांचा प्रपंच पाहिला आहे. त्यांचा मुलगा दिवंगत पांडुरंग जैतू, मुलगी लक्ष्मी उर्फ बेबी गजानन वाटकरे तर सून देवका रघुनाथ जैतू यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. मांदय जैतू यांचे दशविधी कार्य सोमवारी दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी देवाज्ञा झाली त्याच वेळेत सकाळी ९:४५ वाजता नवगाव येथील त्यांच्या राहत्या घरी तसेच विधी कार्य नवगावच्या समुद्रकिनारी होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून त्यांचे दशविधी कार्य होणार असल्याची माहिती जैतूशेठ जैतू यांनी दिली.

Exit mobile version